मुंबईमधून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना लोकांच्या व्हाट्सअपवरती मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला आपण तो व्हिडीओ काय आहे आणि त्यामागील व्हायरल सत्य काय आहे ते पाहूया.
व्हाट्सअपवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करत आहेत. त्यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने हातात मेगामाईक घेतला असून त्यावरुन तो असताना “४० किंवा १४० या क्रमांकाने सुरु होणारे कॉल आल्यास ते घेऊ नका. असे कॉल घेतल्यास तुमच्या अंक खात्यातील सर्व रक्कम निघून जाऊ शकते” अशा पद्धतीची घोषणा करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ आणि त्यासोबतचा मजकूर व्हाट्सअपवर व्हायरल झाल्याने मुंबई आणि परिसरातील नागरिक पॅनिक झाले आहेत आणि नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेऊन यातले सत्य शोधून काढले आहे.
वास्तविकरीत्या व्हाट्सअपवर व्हायरल होणार व्हिडीओ हा मुंबई पोलिसांचा नसून SONY LIV या वाहिनीचा आहे. त्या वाहिनीवरील एका मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.
राज्यातील कोरोनाच्या संकटात लोकांच्या हाताला काम राहिले नाही, लोक आपली बचत वापरुन गुजराण करत आहेत; अशावेळी लोकांमध्ये भीती निर्माण करणारे व्हिडीओ आणि मेसेज व्हायरल करणे चुकीचे आहे. अशा व्हिडिओंवर कारवाईची नागरिकांची मागणी आहे.
बघा काय आहे व्हायरल व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.