१९७१ च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित असणारा “बॉर्डर” हा हिंदी चित्रपट १९९७ मध्ये आला होता. १९७१ च्या भारत -पाकिस्तान युद्धात मुख्यत्वेकरून चार ठिकाणी लढाया लढल्या गेल्या. त्यातल्या राजस्थानच्या सीमेवर झालेल्या “लोंगेवालाची लढाई” या चित्रपटात विस्ताराने मांडण्यात आली आहे.
या लढाईत १२० भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या २८०० सैनिक आणि ६५ रांगड्यांना कडवी झुंज देऊन दिवस उजडेपर्यंत झुंजवत ठेवले होते. सकाळ होताच भारतीय हवाईदलाने आकाशातून जोरदार हल्ला करून पाकिस्तानी रणगाड्यांची धूळधाण उडवली आणि भारताला विजय मिळवून दिला.
भैरवसिंहांनी बजावली या युद्धात महत्वाची भूमिका
बॉर्डर चित्रपटात पडद्यावर सुनील शेट्टीने भैरवसिंहाची भूमिका केली होती, मात्र वास्तविक युद्धाच्या ठिकाणी भैरवसिंह यांच्या रूपात खरा हिरो आपली भूमिका बजावत होता. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील लोंगेवालाची चौकी हे युद्धाचे कुरुक्षेत्र होते.
या चौकीची जबाबदारी २३ पंजावं रेजिमेंटकडे होती. १२० सैनिकांना घेऊन मेजर कुलदीपसिंह चांदपुरी यांच्याकडे होते. यांच्या मदतीसाठी १४ बटालियनच्या कॅप्टन भैरवसिंह यांच्या नेतृत्वाखाली एक उंटाची तुकडी काम करत होती. त्यांनी जवळपास ३० पाकिस्तानी शत्रूला कंठस्नान घातले.
युद्धातील हिरो आजही जगतोय वंचित जीवन
बॉर्डर चित्रपटात कॅप्टन भैरवसिंह शहिद झाल्याचे दाखवण्यात आले होते, मात्र वास्तवात ते जिवंत आहेत. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील सोलंकीया तला गावात आयुष्य व्यतीत करत आहेत. आज त्यांचे वय ७५ असून आजही आपल्याला शौर्य आणि पराक्रमाबद्दल मिळालेली मेडल छातीला लावून ते सैनिकासारखं आयुष्य जगत आहेत.
या पदकाबद्दल महिना २००० रुपये भत्ता मिळायला हवा असे त्यांचे मत आहे, पण आजही त्यांना ती सुविधा मिळत नाही. राजस्थान सरकारकडूनही त्यांना तशी कुठली सुविधा मिळत नसल्याचे ते सांगतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.