प्रत्येकाच्या आयुष्यात क्रोमार्य हि खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवतो त्याविषयी मनात खूप उत्सुकता असते. प्रत्येक जण पहिल्यांदा शारीरिक संबध ठेवण्यापूर्वी खुश असतो तर काही जण गोंधळलेले असतात. पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आपण एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करतो. जे कि पहिल्यापेक्षा वेगळे असते.
पहिल्यांदा शारीरिक संबंध हे एक तर खरं प्रेम असणाऱ्यासोबत किंवा पतीसोबत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण याविषयी आज आपण अशा काही गोष्टी बघूया ज्या तुम्हाला उपयुक्त ठरतील.
१. तुमच्या व्हर्जिनिटीवर फक्त तुमचाच अधिकार आहे-
व्हर्जिनिटी हि तुमचा अधिकार असून ती तुमच्या जाती-धर्माची, आई वडिलांची किंवा समाजाची नाहीये. व्हर्जिनिटीशी निगडित सर्व निर्णय हे तुमचे असतात. त्यामुळे यावर फक्त तुमचाच अधिकार समजा.
२. व्हर्जिनिटी गमावण्याचे कुठलेही वय नाही-
व्हर्जिनिटी गमावण्याचे वय हे ठराविक नाहीये. १९ किंवा ३९, कोणत्याही वयात तुम्ही व्हर्जिनिटी तोडू शकता. फक्त तुम्ही प्रौढ असायला हवे. प्रौढ असल्यावर तुम्हाला सर्व गोष्टींची जाण असते त्यामुळे नंतर पश्चाताप होण्याची वेळ येत नाही.
३. सर्वांकडून असलेल्या दबावातून नका करू सेक्स-
पहिल्यांदा शारीरिक संबंध हि आयुष्यातील खूप महत्वाची आणि उत्साह असणारी गोष्ट आहे. पण दबावातून सेक्स कधीच करू नका. तुमच्या सोबतच्या सर्वानी केला म्हणून तुम्हीही करावाच असे नाही. मित्र म्हणत असतील फॅशन म्हणून किंवा ट्रेंड म्हणून करा तर चुकूनही करू नका. दबावात शारीरिक संबंध पहिल्यांदा आणि कधीच ठेवू नका.
४. शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तुमचा स्वभाव ठरत नाही-
शारीरिक संबंध ठेवणे तुमच्या स्वभावाबद्दल मत ठरवू शकत नाही. तुम्ही लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवू शकता किंवा लग्नानंतर, तुमची इच्छा. शारीरिक संबंध ठेवणे चूक किंवा बरोबर नाहीये फक्त तुमचा निर्णय महत्वाचा आहे.
५. व्हर्जिनिटी तुम्ही निर्मळ आहात का ठरवत नाही-
व्हर्जिनिटी असणे म्हणजे आपण निर्मळ आहे किंवा शुद्ध आहे असा अनेकांचा समज असतो. पण तुमचा भ्रम आहे. पण व्हर्जिनिटी गमावणे हा दोष वगैरे नाहीये. शारीरिक संबंध ठेवल्याने काही पाप होत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लग्नाच्या अगोदर करू शकता किंवा लग्नानंतर करू शकता.
६. तुमचीही होऊ शकते सेक्सची इच्छा-
शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा फक्त पुरुषांनाच असते असा भ्रम असतो. पण असे नाहीये सेक्सचा अधिकार सर्वांचाच आहे. त्यामुळे हे पुरुषांच्या सुखाचं आहे असा गैरसमज ठेवू नका.
७. जगाचा विचार जगालाच करू द्या-
तुम्ही कोणासोबत कधी कसा केला याविषयी प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकता. त्यामुळे दुसऱ्यांचे विचार स्वतःवर लादू नका.
८. हायमेन नाही ठरवत कि तुम्ही वर्जिन आहात कि नाही-
हायमेन सुरक्षित असेल किंवा नसेल तर त्यावरून तुमची व्हर्जिनिटी ठरत नाही. किंवा पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर रक्त आले म्हणजेच तुम्ही वर्जिन आहेत असे काही नाही. हायमेन हे कधी कधी खेळताना, व्यायाम करताना सुद्धा तुटू शकते.
९. कम्फर्ट झोन खूप महत्वाचा आहे-
तुम्ही तुमच्या साथीदारासोबत आरामदायी म्हणजेच कम्फर्ट असणे महत्वाचे आहे. स्वतःला आणि साथीदाराला चांगल्याप्रकारे समजून घ्या. तुमच्या प्रायव्हेट गोष्टी त्याने प्रायव्हेट ठेवायला हव्यात. सर्व काही जाणून घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवू शकता.
१०. प्रोटेक्शन तुमचा अधिकार आहे-
प्रोटेक्शन वापरून तुमच्या जोडीदाराला कधी कधी परमोच्च आनंद मिळत नसेल तर तो म्हणू शकतो कि बिना प्रोटेक्शन करूया पण प्रोटेक्शन वापरणे तुमची पहिली चॉईस असायला हवी. यामध्ये कधीच मागे पुढे बघू नका.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.