कोरोनाच्या आधी या १० महामारी जगासाठी संकट बनून आल्या होत्या

जगभरात कोरोना साथीच्या आजारामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचे मृत्यू झाले असून अजूनही १७ लाख लक्ष या जीवन मरणाची लढाई लढत आहेत. या रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले असून २१ व्या शतकात पहिल्यांदाच कुठल्या रोगासमोर मनुष्यजातीला हतबल होताना बघायला मिळत आहे. परंतु यापूर्वीही अनेक महामारींनी मानवजातीवर घाला घातला आहे. पाहूया त्यापैकी १० मोठ्या महामारींबद्दल…

१) स्पॅनिश फ्लू : पहिल्या महायुद्धादरम्यान पसरलेल्या या महामारीने ५ कोटी लोकांचा बळी घेतला होता. या महामारीला स्पेनमध्ये सर्वाधिक मीडिया कव्हरेज मिळाल्याने तिला स्पॅनिश फ्लू हे नाव मिळाले.

२) अज्ञात महामारी : ५००० वर्षांपूर्वी चीनमध्ये पसरलेल्या एका अज्ञात साथीच्या रोगामुळे एक संपूर्ण गाव मरण पावले होते. नंतर त्या लोकांचे मृतदेह Hamin Manghaनावाच्या एका ठिकाणी ठेवण्यात आले. आज ती जागा पुरातत्व वास्तू आहे.

३) रोम महामारी : इ.स.१६५-१८० मध्ये रोममध्ये पसरलेल्या एका अज्ञात रोगामुळे ५० लाख लोक मृत्युमुखी पडले होते. पार्थियाच्या युद्धानंतर रोमच्या सैनिकांसोबत हा रोग रोममध्ये आला. येथे आली.

४) काळ्या मृत्यूची महामारी : सन १३४६-५३ दरम्यान या महामारीने युरोपची आर्थिक आणि सामाजिक घडी पार विस्कटली होती. या महामारीमुळे जवळपास १० कोटी लोकांचा बळी गेला होता.

५) लंडन महामारी : लंडनमध्ये लागलेल्या बिशन आगीमुळे तिथे प्लेगची महामारी पसरली. लंडनमधील सुमारे १५% लोकसंख्या या महामारीने नष्ट झाली होती.

६) मार्सेली महामारी : १७२० साली प्लेगमुळे फ्रान्सच्या मारशील शहरात जवळपास १ लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. या महामारीला मार्सिलेचा ग्रेट प्लेग म्हणून ओळखले जाते.

७) कॉलरा (कॉलरा) : १८५२-६० दरम्यान दूषित पाण्यामुळे कॉलरा नावाची महामारी पसरली होती. या महामारीने इंग्लंडमध्ये २३००० लोकांचा बळी गेला होता.

८) स्मालपॉक्स : १४०० च्या आसपास अमेरिकन वसाहतींमध्ये पसरलेल्या या महामारीने जवळपास २ कोटी लोकांचा जीव गेला होता.

९) क्षयरोग : क्षयरोगाची पहिली घहटणा १८६७ मध्ये कॅनडात घडली. त्यावेळी युरोपमध्ये २५ % मृत्यू या क्षयरोगाने झाले.

१०) HIV : एड्स ! १९८० मध्ये पहिली घटना उघडकीस आल्यांनतर या रोगाने आतापर्यंत ३.२० कोटी लोकांचा जीव घेतला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.