जर एखादी गोष्ट मनापासून आपण मिळवायचा प्रयत्न केला तर परमेश्वर पण ती गोष्ट आपल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. असे एक वाक्य इंग्लिश साहित्यात सांगितले जाते. अशीच काहीशी गोष्ट सांगितली जाते रुची बिंदल यांच्याबद्दल. रुचीने २०१९ ला लागलेल्या यूपीएससी निकालात पूर्ण देशभरातून ३९ वी रँक मिळवली आहे.
रुचीने यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी ४ वेळा अपयशाचे तोंड पाहावे लागले. तिने चार वेळा नापास झाले म्हणून कधीही नकारात्मकतेला थारा दिला नाही. त्यामुळे पाचव्या प्रयत्नात तिला यश मिळाले. पाचव्या प्रयत्नात ती आयएएस झाली. यूपीएससी परीक्षा खूप कठीण असते.
लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देऊन पास होण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यातील काही मोजक्याच जणांना यूपीएससी पास होण्याचा मान मिळतो. पण काही विद्यार्थी असे असतात जे कायम प्रयत्न करत राहतात आणि त्यांना मग एकदा यश मिळतेच. त्यातीलच एक रुची पण होती.
रुची भविष्यात जाऊन आयएएस होईल हे स्वप्न तिच्या वडिलांनी पहिले होते. रुची मूळची राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील मकराना गावची राहणारी आहे. तिने श्री राम महाविद्यालयांतून बीएची डिग्री पास केली. बीएचे शिक्षण घेतल्यानंतर तिने 2016 मध्ये जामिया मिलिया इस्लामियामधून एमए अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली.
रुचीचा प्रवास तसा कठीणच होता. रुची ४ वेळा यूपीएससी परीक्षांमध्ये नापास झाली. ५ व्या वेळी ती जेव्हा पास झाली तेव्हा तिला आयएएस पद मिळाले. २०१९ या वर्षी रुचीने युपीएसी परीक्षा पास केली. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा चांगला अभ्यास केला. तिने २०१९ मध्ये ३९ वी रँक मिळवली.