भारताला हिंदू संस्कृतीचे विशेष वरदान मिळाले आहे. मात्र भारतीयांना पाश्चात संस्कृतीबद्दल विशेष वेड आहे. पाश्चात खाणे-पिणे, कपडे आणि काही सवयींचे अनुकरण करताना भारतातील अनेक लोक आपल्याला दिसतील. पूर्वीच्या काळात लग्न करत असताना अथवा जुळत असताना स्वर्गात गाठी जुळतात असे म्हटले जायचे. आता मात्र तसे काही राहिलेले नाही.
एका सुंदर १९ वर्षीय तरुणीने चक्क तिच्या आजोबांच्या वयाच्या अशा ६७ वर्षीय म्हाताऱ्यासोबत लग्न केले आहे. या लग्नामुळे जोडप्याचे नातेवाईच नाही तर परिसरातील आणि राज्यातील लोक सुद्धा बुचकळ्यात पडले आहेत. अशी काय गरज पडली अथवा काय अडचण आली की मुलीने थेट म्हाताऱ्यासोबत लग्न केले असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.
वास्तविक मुलीचे आधीच एक लग्न झालेले आहे. मुलीच्या कुटुंबामध्ये जमिनीवरून मोठे वाद सुरु होते. जमिनीच्या वादाच्या प्रकरणावरून सदरील ६७ वर्षीय ,म्हातारा नेहमीच मुलीच्या घरी येत-जात होता. इथेच दोघांची भेट झाली आणि नवीन प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली. सदरील म्हाताऱ्याला पहिल्या लग्नातून ७ मुले आहेत आणि पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे.
यानंतर दोघा प्रेमींनी पळून जाणून लग्न केले. लग्न झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांना हे लग्न मान्य नसल्याने सदरील जोडप्याला धमक्या येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोघांनीही कोर्टात धाव घेतली आहे. आम्हाला काहीही करून सुरक्षा द्यावी असा त्यांचा सूर आहे.
कोर्टानेही आता त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण द्यावे असा आदेश पोलीस प्रशासनाला दिलेला आहे. डीएसपी हथीन रतनदीप बाली यांच्या म्हणण्यानुसार, सध्या न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून या जोडप्याला सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने असेही म्हटले आहे की या जोडप्याने कोणत्या परिस्थितीत लग्न केले त्याची देखील चौकशी केली पाहिजे.
सध्या न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कोर्टाने ठरवलेल्या मुदतीत पोलीस या प्रकरणावर न्यायालयात उत्तर दाखल करतील.या अनोख्या जोडप्यामध्ये, ६७ वर्षीय व्यक्ती पलवल जिल्ह्यातील हातिन भागातील हंचपुरी गावातील रहिवासी आहे. त्याचबरोबर सदरील मुलगी नूह जिल्ह्यातील एका गावातील असल्याचे सांगितले जाते.