१९५९ साली अमेरिकेने चंद्राला अणुबॉम्बने उडवण्याची योजना आखली होती, पण…

चंद्र ! पृथ्वीचा उपग्रह ! लहानपणीच्या गोष्टींमधला चांदोमामा ! अनेक धार्मिक ग्रंथातील चंद्रदेव ! फलज्योतिष्यात स्वतःचे वेगळे स्थान असणारा ग्रह ! एकविसाव्या शतकात चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारताने चांद्रयान मोहीम राबवून आपल्या अवकाश संस्थेची ताकत जगाला दाखवून दिली. परंतु पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या या चंद्राला अणुबॉम्बने उडवून टाकण्याची अमेरिकेने योजना बनवली होती. कदाचित अनेकांना यावर विश्वास बसणार नाही किंवा अनेकांच्या ही गोष्ट पचनी पडणार नाही. पण हे सत्य आहे.

काय आहे हे प्रकरण ?

अमेरिकेला जगातील सर्वाधिक शक्तिशाली राष्ट्र मानले जाते. अमेरिकेजवळ सुपर पॉवर आहे, म्हणूनच जगावर आपला धाक ठेवण्यासाठी अमेरिका अनेक गुप्त योजना राबवत असते. अमेरिकेच्या अशाच एका सिक्रेट योजनेविषयी जॉन ग्रीनवॉल्ड ज्युनिअर याने लिहलेल्या “सिक्रेट्स फ्रॉम द ब्लॅक वॉल्ट” नावाच्या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे. या पुस्तकात दावा करण्यात आला आहे की १९५९ साली अमेरकेने चंद्राला अणुबॉम्बने उडवण्याची गुप्त योजना आखली होती. अमेरिकेतील काही जुनी सरकारी कागदपत्रे गुप्त कागदपत्रांच्या यादीतून वगळल्यानंतर त्याविषयी माहिती उजेडात आल्याचे पुस्तकात सांगितले आहे.

या पुस्तकाच्या अनुसार अमेरिका आणि सोव्हियत संघ यांच्यात शीतयुद्ध सुरु असतानाच्या काळात अवकाशात भरारी मारण्याची देखील स्पर्धा सुरु होती. परंतु १९५९ साली सोव्हियत संघाने आपला स्फुटनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडून या स्पर्धेत बाजी मारली.

सोव्हियत संघाने चंद्राला आपल्या राजकीय ताकतीचे आणि सैन्यबळाचे प्रदर्शन करण्याचा अड्डा बनवल्यास त्यांना प्रत्युत्तर म्हणून थेट चंद्रावरच अण्वस्त्रे डागून चंद्राला उडवून देण्याचा अमेरिकेत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण जगावर अमेरिकेला राज्य करता येईल असा त्यामागचा उद्देश होता. परंतु अमेरिकेनेच सोव्हियत संघाच्या आधी चंद्रावर पाऊल ठेवल्याने त्यांना ही कागदावरील योजना प्रत्यक्षात राबविण्याची गरजच पडली नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.