नमस्कार मित्रांनो, बहुचर्चित बहुप्रतीक्षित महाराष्ट्राचा महासिनेमा सरसेनापती हंबीरराव या सिनेमातलं देवीचा गोंधळ हे गाणं तीन दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अवघ्या काही तासांमध्ये ह्या गाण्याला सोशल मीडियावर तूफान असे व्हीव्ज लाभले आहेत. हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्रवीण तरडे यांच्या या सिनेमामध्ये काय काय असेल यांची महाराष्ट्राला उत्सुकता तर आहेच शिवाय गाण्यांमधून एक एक पानं उघडली जातायत. आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ह्या सिनेमाच्या ट्रेलरने गाण्याने एक वातावरण निर्माण केले आहे.
वाज धमधमधम चौघडा, ताशा तडतडा, काळीज धडधडा, रात्र वैऱ्याची आहे. आशा जबरदस्त वजनदार शब्दांनी गाण्याची सुरवात होते. आणि अडीच मिनिटाच्या गाण्याचे एक एक शब्द आपल्या काळजावर वार काळजावर वार करत. मनात घर करतात. ठेका धरायला भाग पाडेल असं जबरदस्त संगीत, वजनदार गीत, आणि गोंधळाला साजेसा भारदस्त असा आवाज यामुळे गाणं आपल्या मनात घर करून जातं. गाण्यामध्ये सरसेनापती हंबीरराव यांची वाघाच्या चालीने रुबाबात गोंधळाच्या ठिकाणी एंट्री होते. त्यांच्यासोबत यसाची कंक दिसतात. आणि संपूर्ण गाण्यात उपेंद्र लिमये मुख्य भूमिकेत दिसतात.
उपेंद्र लिमये यांनी स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची भूमिका केली आहे. संपूर्ण गाण्याचा उद्देश हा दिसतो की त्या गोंधळामधून सरसेनपतींना सावधानतेचा इशारा द्यायचा आहे, त्यासाठी आई भवानीजवळ बहिर्जी नाईक आशीर्वाद मागत आहेत. ताकद मागत आहेत. गाण्याच्या सुरवातीला सरसेनापती हंबीरराव यांना बहिर्जी नाईक नाचत नाचत खुनवून सांगत आहेत की, सावध रहा, रात्र वैऱ्याची आहे. एकंदरीत संपूर्ण गोंधळ सरसेनापती हंबीरराव यांना सावधानतेचा इशारा देणारं आहे, गनिम जवळपास आला आहेहे गाणं पाहता आपल्या लक्षात येतं.
ह्या भव्य सिनेमाचं हे गाणं सुद्धा भव्यदिव्य आहे. पन्नास साठ गोंधळी चाळीस मावळे ह्या गाण्यात गोंधळाचा आनंद घेताना नाचत आहेत. धगधगत्या मशालीनी गाणं सजलय. भंडारा उधळत सगळे नाचण्यात दंग झाले आहेत.
ह्या गाण्याचे संगीत आणि शब्दबद्ध नरेंद्र भिडे यांनी केले आहे. तर नांदेश उमप यांनी ह्या गाण्याला भारदस्त आवाजाने चार चंद लावले आहेत. एकदा नक्कीच हे गाणं तुम्ही बघितलं नसल ते बघायलाच पाहिजे. ह्या सिनेमाच लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं असून, उर्वीता प्रोडक्शन अंतर्गत ह्या सिनेमाची निर्मिती शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेद्र बोरा यांनी केली आहे. या सिनेमाचे डीओपी महेश लिमये हे आहेत.
ह्या सिनेमात प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मीहिते यांची भूमिका साकारली आहे. तर गश्मीर महाजन यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. उपेंद्र लिमये यांनी बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारली आहे. हा महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या २७ मे ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. स्वराज्याच्या सरसेनापतीची शौऱ्यगाथा बघायला जायलाच पाहिजे.