केतकी चितळे आणि चर्चा हा विषय काही मिडियाला नवीन नाही आहे. नेहमी काहीना काही वेगळ्या गोष्ठी मुळे ती चर्चेत राहते. मागे तिने मराठीचा अपमान केला असे सांगून नेटकर्यांनी तिला ट्रोल केले आणि त्याच्या नंतर केतकी चितळेने राज ठाकरे, मुख्यमंत्री इ. भेट घेतली आणि तिची आपबिती सांगितली. आणि त्यानंतर आलेला व्हिडीओ व्याकरणाचा हा तर सगळी कडे चर्चेचा विषय झाला होता.
एक प्रकरण थांबत नाही तर केतकी चितळे हिचे दुसरे प्रकरण सुरु झाले आहे. काही Stand up कॉमेडीयन यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर कॉमेडी केली आणि त्या नंतर शिवप्रेमीनि यांना चांगलाच धडा शिकवला. परंतु हा सर्व प्रकार घडल्या नंतर तिने खालील प्रमाणे पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली आहे,
“शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!
सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.
अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!
सुधारणा करा बाळांनो, शिका.”
यानंतर शिवप्रेमीनि तिला चांगलेच ट्रोल केले आहे यामध्येच तिचा एक फोटो वायरल झाला आहे ज्यावर ती पायावर असलेला काहीतरी डाग वगैरे दाखवत आहे. या बाबत अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. या फोटो संबंधी तिचे खालील प्रमाणे फेसबुकवर खुलासा केला आहे.
ती सांगत आहे कि हा फोटो जुना आहे, केतकी ला फेफरे येतात याला काही भागात फिट सुध्दा म्हटले जाते. एक दिवस अचानक तिला फेफरे भरले आणि ती पडली यामुळे झालेली ती जखम आहे असे ती या फोटोत सांगत आहे. तिला आठवत नाही कि हि जखम काय लागल्या मुळे झाली परंतु फेफरे आल्यानंतर ती जेव्हा शुद्धीत आली तेव्हा तिला हि जखम झाली होती.
परंतु शिवप्रेमीनि तिला या फोटोवर देखील चांगलेच ट्रोल केलेले दिसत आहे. आपल्याला वरील माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.