मुळशी पैटर्न शब्द अनेकांच्या कानावर आहे परंतु वेगळ्या कारणामुळे परंतु याच मुळशीत शेतीचा पैटर्न राबविणारे क्रांतिकारी शेतकरी ज्ञानेश्वर बोडखे यांची वार्षिक उलाढाल बघितली तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसणार. ८ जणांचे कुटुंब असलेले बोडखे हे पारंपारिक भात आणि दुधाचा धंदा करत होते परंतु पोटापुरते देखील यामध्ये उत्पन्न त्यांना मिळव नव्हते त्यामुळे काहीतरी नवीन करायचे त्यांनी ठरविले आणि हा पैटर्न यशस्वी झाला.
कधीकाळी कंटाळून शेती सोडून त्यांनी एका बिल्डरच्या हाताखाली देखील काम केले. सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत काम करून त्यांना कळले या कामामुळे आपल्याला काही मिळणार नाही, काहीतरी शेतकऱ्यासाठी नवीन करावे लागेल. परंतु पुढे काय करायचे हा प्रश्न होता. एकदिवस पेपर वाचताना सांगलीची बातमी दिसली ज्यामध्ये १००० स्क्वेअर फुट मध्ये १२ लाखाचे उत्पन्न घेतलेला शेतकरी त्यांनी बघितला.
त्यानंतर नौकरी सोडून त्यांनी horticulture व पॉलीहाउस शेती याविषयी माहिती घेतली काही ठिकाणी प्रशिक्षण देखील घेतले आणि परत शेतीकडे वळले. परंतु प्रशिक्षणात सर्व काही थेअरी मध्ये शिकविण्यात येत होते काहिती प्रात्यक्षिक नव्हते त्यानंतर त्यांनी विनंती करून कळविले कि त्यांना त्या विभागासोबत काम करायचे आहे. रोज सकाळी १७ किमी सायकल ने प्रवास करत सकाळी ७ ते ७ काम करत त्यांनी या शेतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
सर्वप्रथम १९९९ साली त्यांनी पॉलीहाउस मध्ये सुशोभीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या फुलाचा व्यवसाय सुरु केला. सुरवातीला स्थानिक मार्केट, हॉटेल आणि त्यानंतर दिल्ली, मुंबई, पुणे शहरात त्यांची फुले विविध मार्केटमध्ये जाऊ लागली. या एका वर्षात त्यांनी घेतलेले १० लाखाचे कर्ज त्यांनी फेडले आणि त्यांना शेतीचे महत्व कळाले.
लोकल न्यूज वाल्यांनी त्यांच्या अनेक मुलाखती घेतल्या या शेतीविषयी अनेक लोक त्यांना विचारणा करू लागले. अनेकांना मदत केल्यानंतर त्यांच्या जवाबदारी वाढू लागली २००४ साली नाबार्डच्या मदतीने त्यांनी “अभिनव शेतकरी समूह” सुरु केला. या इतर ११ लोकासोबत त्यांनी शेती सुरु केली. या मुळे उत्पन्नात वाढ आणि कामाचा ताण देखील कमी झाला. काहीदिवसात ११ पासून हा ग्रुप ३०५ सदस्या पर्यंत पोहचला.
समूह शेती मुळे महिन्याला २५,००० कमविणारा शेतकरी वर्षाला ५००० कमवू लागला. मालाची वाहतूक करण्यासाठी त्यांनी ३०० मारुती कार देखील खरेदी केल्या यामुळे माल लवकरच सर्वत्र पोहचू लागला. काही काळाने फुलाचे भाव कोसळले व ग्रुपच्या सदस्याची संख्या कमी होऊ लागली. भारतीय भाज्या पेक्षा विदेशी भाजीपाल्यास जास्त भाव मिळते हे त्यांच्या लक्षात आले.
तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांनी विदेशी भाजीपाला, फळे इत्यादीचे उत्पन्न सुरु केले. कमी मनुष्यबळात हे काम होत होते. एकरी १२ लाख रुपये उत्पन्न त्यांना यापासून आरामात मिळत होते. सध्या अभिनव फार्मर क्लबचे काम तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात,मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यात पोहचले आहे. १.५ लाख शेतकरी यासोबत जुळले आहे. वार्षिक ४५० करोड रुपये या ग्रुपची उलाढाल पोहचली आहे.
आपण या इमेल आयडीवर त्यांना संपर्क करू शकता abhinavfarmersclub@gmail.com. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.