देशातील कोरोनाची प्रकरणे आता बर्याच प्रमाणात कमी झाली आहेत. तथापि यादरम्यान तज्ञांचा असा विश्वास आहे की देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट होण्याची शक्यता आहे. बर्याच राज्यांनी तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आधीच पाठपुरावा केला आहे. तसेच असेही म्हटले जात आहे की तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक त्रास होईल.
दुसर्या लाटेमध्येही पहिल्या लाटेपेक्षा जास्त तरुण मुलांना संसर्ग झाला. अशा परिस्थितीत सरकारने लहान मुलांविषयी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आयुष मंत्रालयाने लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
मास्क आवश्यकच
आयुष मंत्रालयाच्या मते कोरोनापासून मुलांचे संरक्षण करण्याचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे मास्क वापरणे. मुलांच्या शरीरात कोरोना व्हायरस येऊ नये म्हणून त्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे, विशेषत: जेव्हा ते कुठेतरी बाहेर जात असतील. फारच लहान मुलं मास्क घालू शकत नाहीत, परंतु ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मास्क अनिवार्य आहेत. २ ते ५ वर्षे वयोगटातील मुलं देखील मास्क घालू शकतात, परंतु या काळात पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे.
विषाणू आणि बॅक्टेरियामुळे होणारा कोणताही रोग टाळण्यासाठी साबण आणि पाण्याने आपले हात स्वच्छ धुणे हा एक चांगला मार्ग आहे. आपल्या मुलांमध्येही ही सवय लावा असे आवाहन आयुष मंत्रालयाने केले आहे.
लहान मुलांना कोरोना होऊ न देण्यासाठी आयुष मंत्रालयाने ५ नियम सांगितले आहेत. १) लहान मुलांना पिण्यासाठी कोमट पाणी द्या. २) दोन वर्षांच्या पुढील मुलांकडून सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासून घ्या. ३) जर मुलं खूपच लहान असतील तर त्यांना नियमितपणे तेलाने मालिश करा, त्यांच्या नाकपुड्यात तेलाचे थेंब टाका. ४) कोमट पाण्याने पाच वर्षावरील मुलांकडून चुळा भरुन घ्या. ५) पाच वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार योगासने करायला लावा.