२ जुलै २०२० च्या रात्री उत्तरप्रदेशच्या कानपूरमधील बिकरु या गावात पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या गॅंगने ८ पोलिसांना ठा र केले होते. त्यानंतर विकास दुबे आपल्या साथीदारांसह फरार झाला. विकास दुबे हा ६० खटल्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड होता. उत्तरप्रदेश पोलिसांची ६० पथके त्याच्या मागावर होती. आठवडाभर त्याने पोलिसांना चकमा दिला.
दरम्यान पोलिसांनी त्याच्या पाच साथीदारांचा ए न्काउंटर केला. ९ जुलैच्या रात्री उज्जेनच्या महाकाल मंदिरात नाट्यमयरित्या दुबे पोलिसांच्या हाती लागला. त्याला उज्जेनवरुन कानपूरला आणले जात असताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला आणि पळून जायच्या तयारीत असणारा विकास दुबे पोलीस ए न्काउंटरमध्ये ठा र झाला.
कुख्यात गुंड विकास दुबेने या ६ धंद्यांमधून कमावली होती २०० कोटी रुपयांची संपत्ती .
१) कारखान्यांकडून वसुली : कानपुर परिसरात विकास दुबेची इतकी दहशत होती की आसपासच्या ४०० कारखान्यांकडून त्याला हप्ते मिळायचे. २) विकास दुबे हायवेने मालवाहतूक करणारे ट्र्क लुटायचा. त्यातल्या काही भाजीपाला आणि किराणा वस्तू तो त्याच्या बिकरु गावातील लोकांमध्ये वाटायचं, त्यामुळे गावातील सगळे लोक त्याच्या बाजूने होते.
३) विकास दुबे कानपूरच्या अनेक बस स्टॅन्ड आणि बस मालकांकडून खं डणीच्या रूपात पैसे वसूल करायचा. ४) सरकारी कामांमध्ये लोकांना टेंडर आणि ठेकेदारी मिळवून देण्याच्या बदल्यात विकास दुबे ४०% टक्केवारी घ्यायचा.
५) विकास दुबे कानपुर, लखनौ भागात भागातील लिटिगेशन आणि जमिनीच्या वादांमध्ये पैसे घेऊन जबरदस्ती, हाणामा ऱ्या करुन जमिनी मिळवून देण्याची कामे करायचा. १९९९ मध्ये अशाच एका प्रकरणात त्याने अंदाधुंद गो ळीबारही केला होता. ६) उद्योगपतींकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली दरमहा ५० लाखांपर्यंत कमाई करायचा. त्याबदल्यात तो काळे धंदे करणाऱ्या उद्योगपतींना आपल्या गुंडांचे संरक्षण पुरवायचा.
अशा वेगवगेळ्या कामांमधून विकास दुबेने २०० कोटींची संपत्ती जमवली होती. त्याच्या स्वतःच्या बिकरु गावात बंकरनुमा नावाचा त्याचा ५२००० स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला आलिशान बंगला होता. लखनौमध्येही त्याचे दोन आलिशान बंगले होते. त्याच्याकडे ५० कोटींहून अधिक किमतीच्या जमिनी होत्या. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या होत्या. आपल्या नातेवाईकांच्या नावावर त्याने अनेक प्लॉट्स आणि फ्लॅट विकत घेतले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.