आपण आजपर्यंत अनेक अशा विदेशी वस्तूंबद्दल ऐकलं असेल, ज्यांना भारतात बंदी घातली आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा भारतीय वस्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर आरोग्याच्या कारणांमुळे भारताबाहेर बंदी घालण्यात आली आहे. भारतात खुलेआम विकल्या जाणाऱ्या या १० वस्तू भारताबाहेरच्या देशात बॅन आहेत.
१) लाईफबॉय साबण : “लाईफबॉय है जहाँ, तंदुरुस्ती है वहां” असे म्हणत ९९.९% किटाणू नष्ट करण्याचा दावा करत भारतात विकल्या जाणाऱ्या लाईफबॉय साबणावर अमेरिकेत बंदी आहे. ही साबण त्वचेसाठी हानिकारक मानली जाते. तिथले लोक जनावरांना अंघोळ घालण्यासाठी साबणाचा वापर करतात.
२) रेडबुल : भारतात एनर्जी ड्रिंक म्हणून अगदी स्वीट होममध्ये देखील विकल्या जाणाऱ्या रेडबुलवर फ्रांस आणि डेन्मार्कमध्ये बंदी आहे. या ड्रिंकमुळे हृदयविकाराचा झटका, डिहायड्रेशन, हाय बीपी अशा आजारांना चालना मिळते असे मानले जाते.
३) डिस्प्रिन : भारतात एखाद्याला डोकेदुखी असली की तो व्यक्ती मेडिकलमधून डिस्प्रिन टॅबलेट आणून खातात. परंतु आंतरराष्ट्रीय निकषांवर खरे न उतरल्यामुळे अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये डिस्प्रिनवर बंदी घालण्यात आली आहे.
४) कीटकनाशक : भारतात खतांच्या दुकानांमध्ये खुलेआम विकल्या जाणाऱ्या डीडीटी, एंडोसल्फान आणि अन्य प्रकारच्या ६० हून अधिक कीटकनाशकांवर विदेशात बंदी आहे. ही कीटकनाशके पिकांच्या माध्यमातून मानवी शरीरात आल्यामुळे घटक आजार संभवतात असे मानले जाते.
५) कच्चे दूध : भारतात दूध डेअरी किंवा गोठ्यांवर कच्चे दूध सहजरित्या विकले जाते. परंतु अमेरिका आणि कॅनडामध्ये मात्र कच्च्या दुधात मानवी शरीरास अपायकारक असे सूक्ष्मजंतू असल्याने ते दूध विकण्यावर निर्बंध आहेत. तिथे केवळ पाश्चराइज्ड दूध विकले जाते.
६) जेली : भारतात लहान मुलांना कुठल्याही दुकानात जेली चॉकलेट्स विकत मिळतात. परंतु अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्यावर बंदी आहे. जेली लहान मुलांच्या आरोग्यासाठी घटक मानली जाते, त्यामुळे लहान मुलांमध्ये श्वसनासंबंधी विकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
७) निमूलीड : हे एक पेनकिलर औषध आहे जे भारतात कुठल्याही दवाखान्यात किंवा मेडिकलमध्ये मिळते. परंतु अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे औषध लिव्हरसाठी घटक मानले जाते, त्यामुळे त्या देशांमध्ये त्यावर बंदी आहे.
८) डी-कोल्ड टोटल : भारतात टीव्हीवर जाहिरात दाखवून डी-कोल्ड टोटल हे सर्दीवरचे औषध विकले जाते. परंतु भारताबाहेर अनेक देशात बॅन आहे. हे औषध किडनीसाठी अत्यंत अपायकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
९) अल्टो ८०० : भारतात मध्यमवर्गीयांसाठी अल्टो ८०० म्हणजे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. परंतु ग्लोबल NCAP टेस्ट पास करण्यात अपयशी ठरल्यामुळे भारताबाहेर अनेक देशांनी त्यांच्या देशात या कारवर बंदी घातली आहे.
१०) किंडर जॉय : भारतात तर किंडर जॉय म्हणजे प्रत्येक घरातील लहान मुलांची आवडते चॉकलेट आहे. अमेरिकेत मात्र हे चॉकलेट लहान मुलांच्या आरोग्यासाठी अपायकारक मानून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही, तर तुम्ही जर हे चॉकलेट अमेरिकेत घेऊन गेला तर सापडल्यावर तुम्हाला प्रति किंडर जॉय चॉकलेटमागे १ लाख ८६ हजार ३४९ रुपये दंड भरावा लागू शकतो.