बॉलीवूडवर पुन्हा एकदा शोककळा, शाहरुखसोबत काम केलेल्या अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप..

२०२० वर्ष अनेक कारणांनी संकटांचे ठरले आहे. जगात कोरोनाचा हाहाकार झाला. भारतातही यावर्षी अनेक दुःखद घटना घडल्या असून बॉलीवूडवर सर्वात जास्त दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बॉलीवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यातच आता पुन्हा एका अभिनेत्याच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

एका हुरहुन्नरी अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. काल बॉलिवूड अभिनेता रंजन सहगलचे वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी निधन झाले आहे. मल्टिपल ऑर्गन फेलियरमुळे त्यांचे निधन झाले. रंजन पंजाबच्या जीरकपूर येथे होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना चंदीगड येथील रूग्णालयात हलविण्यात आले. व्हेंटिलेटरची डिमांड करण्यात आली. मात्र तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ न शकल्याने काही वेळात त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईवरून गावी परतले होते रंजन-

अभिनेता रंजन मुंबईत एकटाच राहायचे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांनी मुंबईत कोरोना टेस्टही करून घेतली होती. मात्र ती निगेटीव्ह आली होती. त्यानंतर ते गावी परतले होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूड व पंजाबी चित्रपटसृष्टीत शोकळा पसरली आहे. रंजन यांनी टीव्हीशिवाय बॉलिवूड व पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत काम केले.

शाहरुखसोबत झिरो मध्ये केले होते काम-

रंजन शाळेत असतानाच वडिलांचे निधन झाले होते. कॉलेजच्या दिवसांत पार्ट टाईम नोकरी करून त्यांनी आपले शिक्षण केले. याच दिवसांत त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. २०१४ मध्ये त्यांनी नव्या छाब्रासोबत लग्न केले होते. मात्र त्यांचा घटस्फोट झाला होता.

रंजनने रंगभूमीपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याने अभिनयात चांगली छाप पाडली होती. रंजन यांनी क्राईम पेट्रोल, रिश्तों से बडी प्रथा, सावधान इंडिया अशा अनेक मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय रंजनने शाहरुख खानसोबत झिरो या सिनेमात देखील भूमिका निभावली होती. रणदीप हुड्डासोबत ‘सरबजीत’ या सिनेमातही ते झळकले होते.

२०२० वर्ष बॉलीवूडसाठी दुःखद-

२०२० मध्ये बॉलीवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंग राजपूत, वाजिद खान, मोहित बघेल, सरोज खान यांनी यावर्षी जगाचा निरोप घेतला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.