बिग बॉस हा जगप्रसिद्ध कार्यक्रम आहे. अमेरिकेतील बिग ब्रदर या कार्यक्रमाच्या धर्तीवर हा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. प्रत्येक सीजन मध्ये काहीना काही कारणास्तव हा शो प्रसिद्ध होतो. एका घरात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले स्पर्धक एका ठिकाणी एका घरात ठेवल्या जातात. त्यानंतर हा खेळ सुरु होतो. १४ वर्षापासून हा शो कलर्स या चैनलवर सुरु आहे.
मागील ११ वर्षापासून हा शो सलमान खान होस्ट करत आहे. बिग बॉस हिंदी सोबतच मराठी,तमिळ,मल्याळम इत्यादी भाषेत देखील प्रसारित झाला आहे. यावर्षी देखील बिग बॉस सुरु झाला आहे. आणि स्पर्धक पुढील प्रमाणे आहे. परंतु या स्पर्धकांना त्यांच्या चेहऱ्याच्या प्रसिद्धीनुसार पैसे मिळतात. खासरेवर त्या विषयीच आज आपण माहिती बघणार आहो.
या वर्षी फ्रेशर्स आणि सिनियर असा कन्सेप्ट बिग बॉस मध्ये आणण्यात आला होता. बिग बॉस मधील स्पर्धक आणि त्याचे एक आठवड्याचे मानधन पुढील प्रमाणे आहे. जेवढे जास्त दिवस स्पर्धक घरात राहणार तेवढा जास्त पैसा त्याला मिळणार.
शेहजाद देवल- ५० हजार रुपये प्रती आठवडा, जान कुमार सानू- ८० हजार रुपये प्रती आठवडा, राहुल वैद्य- १ लाख रुपये प्रती आठवडा, निक्की तांबोळी=१.२ लाख रुपये प्रती आठवडा, पवित्रा पुनिया- १.५ लाख रुपये प्रती आठवडा, अभिनव शुक्ला १.५ लाख रुपये प्रती आठवडा, एजाज खान- १.८ लाख रुपये प्रती आठवडा, निशांत सिंग मलकानी २ लाख रुपये प्रती आठवडा
सारा गुरूपाल – २ लाख रुपये प्रती आठवडा, जस्मिन भसीन- ३लाख रुपये प्रती आठवडा, रुबिना द्लिक- ५ लाख रुपये प्रती आठवडा आणि यांच्या सोबत आलेले सिनियर स्पर्धक जे मागील सीजन चे विजेता होते त्यांना पुढील प्रमाणे मानधन देण्यात येत आहे. सिद्धार्थ शुक्ला ३२ लाख प्रती आठवडा, हीना खान २५ लाख रुपये प्रती आठवडा, गौहर खान २० लाख रुपये प्रती आठवडा.
सिनियर स्पर्धक घराबाहेर गेलेले आहे. तसेच शेहजाद देवल व सारा गुरूपाल देखील शो मधून आउट झालेले आहेत. पुढे बघूया नेमक या खेळात अजून काय काय होणार. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.