नाना पाटेकर भारतीय सिनेसृष्टी मधील लखलखणारा तारा, आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकाच्या मनावर छाप नाना पाटेकर यांनी छाप सोडली आहे. नानाचा सहज अभिनय आपल्या मनात घर करून जाते. याहून महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा मोठा अभिनेता असून नाना पाटेकर यांचे राहणीमान अतिशय सामान्य आहे.
त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे.
तीनदा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’ आणि ‘अग्निसाक्षी’ या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 2013 मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला.
नाना पाटेकर यांनी अभिनेता होण्या अगोदर वेगवेगळे काम केले आहे. नाना पाटेकर यांनी अभिनयाची सुरवात हि वडिलासाठी केली होती असा तो सांगतो. अभिनयात त्यांच्या आवाजातील संवाद नेहमी साठी स्मरणात राहतात. जसे “एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है” क्रांतिवीर मधील हिंदू आणि मुस्लीम यांचा सीन तसेच नटरंग मधील अनेक संवाद आजही प्रेक्षकाच्या मनावर राज्य करतात.
हि होती नाना पाटेकर यांची पहिली नौकरी
वडिलांचा व्यवसाय होता परंतु काही कारणाने व्यवसाय बंद झाला नुकसान झाले त्यामुळे नानाला काम करावे लागले. त्याला पहिले काम मिळाले “सिनेमाचे पोस्टर लावणे” या कामासाठी नानाला ८ किमी पैदल जाणे आणि ८ किमी पैदल येणे एवढे पायपीट करावी लागत होती. ३५ रुपये महिना आणि एक वेळचे जेवण एवढे मानधन त्याला मिळत होते. एवढ्या कमी पगार आणि काम त्याला खूप काही शिकवून गेला असे तो सांगतो.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.