नुकतीच पेट्रोलने शंभरी पार केली आहे. त्याची झालं सर्वांच्याच खिशाला बसली आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे जनता हैराण झाली आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना या दरवाढीविरोधात आंदोलनही करता येत नाही. लोक सोशल मीडियावरुनच या दरवाढीचा निषेध नोंदवून आपला राग व्यक्त करत आहेत. पेट्रोल दरवाढीवर टीकात्मक मिम्स देखील शेअर केले जात आहेत. पण पेट्रोल पंपावर केवळ महागच पेट्रोलचा मिळत नाही, तर ६ प्रकारच्या सुविधाही तुम्हाला मिळतात आणि त्या देखील मोफत ! चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सुविधा…
विपणन शिस्त मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक पेट्रोल पंपचालकांसाठी काही नियमावली ठरवण्यात आली आहे. त्या अंतर्गत ग्राहकांना पुढील प्रकारच्या सेवा देणे आवश्यक आहे. १) पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या सर्व वाहनचालकांना आपल्या वाहनांच्या चाकांमध्ये मोफत हवा भरुन देण्याची व्यवस्था पंपचालकांना करावी लागते. त्यासाठी वाहनचालकांना कुठलेही शुल्क द्यावे लागत नाही. २) पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी मोफत पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे पंपचालकांसाठी बंधनकारक आहे.
३) प्रत्येक पेट्रोल पंपाच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष ग्राहकांसाठी स्वतंत्रपणे शौचालयाची व्यवस्था करणे पंपचालकांना अनिवार्य करण्यात आले आहे. ही शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत असावीत. पंपाच्या ठिकाणी मोफत शौचालय पुरवण्यात पंपचालक कुचराई करत असतील तर त्याविषयी तक्रार करण्याचा ग्राहकांना अधिकार असतो. ४) पंपाच्या ठिकाणी कस्टमरला त्यांच्या आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या व्यक्तींना संपर्क करण्यासाठी पंपचालकांनी टेलिफोनची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. पेट्रोल पंप सुरु करतेवेळीच पंपमालकांनी एका स्वतंत्र टेलिफोन क्रमांकाचे रजिस्ट्रेशन करावे लागते.
५) पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटी असणेही बंधनकारक असते. त्या पेटीमध्ये प्रथमोपचारासाठी लागणारी औषधे आणि साहित्य असावे लागते. ग्राहकांच्या बाबतीत अचानक एखादा अपघात घडल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी आवश्यक असणारे प्रथमोपचार करण्याच्या दृष्टीने या सेवेचा उपयोग होऊ शकतो. ६) पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्या ठिकाणच्या पेट्रोल किंवा डिझेलची गुणवत्ता आणि मीटरचे प्रमाण तपासण्याचा अधिकार आहे. यासोबतच अचानक आग लागल्यास ती आग विझवण्यासाठी आवश्यक असणारे सेफ्टी गॅस, वाळूने भरलेली बकेट्स असणे आवश्यक आहे.