निल आर्मस्ट्राँग ! चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला व्यक्ती म्हणून ज्याला जग ओळखते. १९६९ साली नासाच्या अपोलो अवकाशयानातून नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन हे दोघे अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर गेले होते. २० जुलै १९६९ रोजी त्यांचे यान चंद्रावर उतरले. त्यानंतर काही तासांनी नील आर्मस्ट्राँग बाहेर आला आणि त्याने चनद्रवर पहिले पाऊल टाकले. त्यामामागोमाग आल्ड्रिनही आला. आर्मस्ट्राँग अडीच तास आणि आल्ड्रिन सव्वादोन तास चंद्रावर होते. त्याठिकाणी त्यांनी अमेरिकेचा ध्वज फडकावला.
चंद्रावरुन परतताना त्यांनी काही माती, दगडांचे सॅम्पल गोळा केले आणि ते यानात बसून परतीच्या प्रावासाला निघाले. पॅसिफिक समुद्रावर हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना सुरक्षित यानातून उतरवण्यात आले. इथे एक गंमत घडली. चंद्रावर गेलेले हे अंतराळवीर आपल्यासोबत चंद्रावरील अपायकारक बॅक्टरीया घेऊन आलेत आणि त्यामुळे पृथ्वीवरील मानवजातीला धोका आहे अशी अफवा पसरली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संशोधकांनीही ह्युस्टनमधील एका प्रयोगशाळेत या अंतराळवीरांना १८ क्वारंटाईन करुन ठेवले. जेव्हा डॉक्टरची खात्री पातळी, तेव्हाच त्यांना तिथून सोडण्यात आले.
चांद्रमोहिमेच्या यशामुळे जगातील अनेक नेते, राजा-राणींना आर्मस्ट्राँगला भेटायची इच्छा होती. नासाच्या वतीनेच त्यांचा जागतिक दौरा आयोजित करण्यात आला. दरम्यान भारतातील दिल्लीतही अंतराळवीर आले. त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री निवासात जाऊन तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भेट घेतली. त्याच्यावेळी तत्कालीन परराष्ट्रमंत्री नटवरसिंह तिथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर एक किस्सा घडला. नटवरसिंग जेव्हा अंतराळवीरांना घेऊन इंदिरा गांधींच्या कार्यालयात गेले.
तिथे गेल्यानंतर नटवरसिंहांनीच नील आर्मस्ट्राँगला सांगितले, “आमच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी तुमच्या चांद्रमोहिमेकडे इतके लक्ष देऊन होत्या की तुमचा चंद्रावर उतरल्याचा क्षण निसटून जाऊ नये यासाठी त्या पहाटे साडेचार वाजेपर्यंत जागल्या.” यामुळे आर्मस्ट्रॉंगला वाईट वाटले. तो जागेवरुन उठला आणि पुढे सरसावत इंदिरा गांधींना म्हणाला, “माननीय प्रधानमंत्र्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांची क्षमा मागतो. पुढच्या वेळी मी लवकर चंद्रावर उतरेल.” आर्मस्ट्राँगची विनम्रता आणि हजरजबाबीपणा पाहून इंदिरा गांधींनीही त्याचे कौतुक केले.