दीपक शुक्ला नावाचे दरभंगा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या शेजारच्या घरात एक सात वर्षांचा मुलगा होता. महिनाभरापूर्वी तो मुलगा खेळत असताना त्याच्याकडचा बॉल कुत्र्याला लागला आणि कुत्रा त्या मुलाला चावला. त्या कुत्र्याला रेबीज झाला होता. ते कुत्रं पिसाळलेलं होत. घरातील लोकांनी मुलाची मलमपट्टी केली. पण काहीच वेळातच त्या मुलाची तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली. अचानक तो मुलगा पाण्याला घाबरायला लागला. त्याच्या अंगातील ताप आणि अशक्तपणा वाढत गेला आणि महिन्याभरातच त्याचा मृत्यू झाला. भारताच्या राष्ट्रीय आरोग्य पोर्टलनुसार दरवर्षी २०००० लोक रेबीजमुळे मृत्यूमुखी पडतात. आज आपण त्या रेबीजबद्दलच वाचणार आहोत.
रेबीज म्हणजे काय असतं ?
रेबीज हा एक असा आजार आहे जो आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थावर परिणाम करतो. आजारी प्राण्यापासून तो माणसाला होतो. रॅप्टो नावाच्या व्हायरसमुळे होते हा आजार होतो. या आजारावर कुठलाही उपचार नाही. हा आजार १००% प्राणघातक आहे. परंतु चांगली गोष्ट म्हणजे या आजारापासून वाचणं देखील तितकंच सोपं आहे.
रेबीज कशामुळे होतो ?
जास्तकरुन रेबीज झालेल्या कुत्र्यांच्या चावण्यामुळेच माणसाला रेबीज होतो. पण माकड, घोडा, जंगली उंदीर, वटवाघूळ, गाढव, इत्यादि सारख्या इतर रेबीज झालेल्या प्राण्यांच्या चावण्याने, ओरबडण्याने, त्याला गोंजरण्याने किंवा त्याच्या संपर्कात आल्याने देखील रेबीज होऊ शकतो. केवळ माणसांनाच नाही तर गाईम्हशींना देखील रेबीजग्रस्त जनावराने चावा घेतल्यास या रोगाचा संसर्ग होतो.
पिसाळलेलं कुत्र चावल्यावर काय होते ?
साधारणपणे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावण्याने चाव्याच्या ठिकाणी खाज सुटते. ताप येतो. माणसाला पाण्याची भीती वाटायला लागते. त्याला प्रकाश नकोसा होतो. जोरदार वारे किंवा आवाज याविषयी त्याच्या मनात एकप्रकारची भीती तयार होते.
कुत्रा चावल्यावर काय करावे ?
पिसाळलेले कुत्रे चावल्यावर जखम साबणाने १५ मिनिटे स्वच्छ धुवावी. ७०% अल्कोहोल निर्जंतुकाने जखम स्वच्छ करावी. त्यानंतर दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घ्यावे. जखमेवर मिरची पावडर वापरु नये. पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्याच्यासारखाच वागतो ही अफवा आहे.