आई वडिलांची नोकरी गेली, परीक्षेपूर्वी झाला त्याचा अपघात तरीही बनला सर्वात तरुण IPS!

भारतातील कित्येक तरुण दरवर्षी यूपीएससी परीक्षेच्या मृगजळाला बळी पडत असतात. लाख दोन उमेदवारांपैकी काहीजण यशाच्या शिखरावर चढतात तर काहीजण अपयशी होऊन परततात. काही जण दुसरे पर्याय शोधतात आणि आपल्या मेहनतीच्या जीवावर इतर सरकारी परीक्षा उत्तीर्ण होतात.

असाच एक योगायोग आयपीएस सफिन हसनच्या बाबतीत झाला. सर्वात तरुण आयपीएस अधिकारी म्हणून सफिन हसनला ओळखले जाते. सफिन हसन हा मूळचा गुजरातमधील छोट्याशा असणाऱ्या कनोदर या गावचा आहे. आपल्या घरच्या स्वयंपाकघरात सफिनने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले.

हिऱ्याच्या युनिटमध्ये काम करणाऱ्या सफिनच्या आई -वडिलांच्या मते सफिन बालपणापासूनच उच्चशिक्षण घेण्याकडे वळला होता. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य असूनही त्याने अभ्यासाच्या बाबतीत खूप मेहनत घेतली. सफिनचे आईवडील देखील अत्यंत पोटतिडकीने आपल्या मुलासाठी जेवढे जास्त करता येईल तेवढं जास्त काम करायचे. सफिनची आई नसीमबानू सकाळी ३ वाजता उठत असायची. मुलाच्या शिक्षणाला आधार देण्यासाठी दरमहा ती ५ ते ८ हजार रुपये कमवायची.

साफिन घरच्यांच्या कष्टांकडे पाहत असायचा आणि आपल्याला हे सर्व बदलायचे आहे यासाठी आणखी मेहनत घ्यायचा. एक दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली होती आणि सफिनही उत्सुकतेने त्यांना बघण्यासाठी आला. त्यांचा दरारा आणि त्यांच्या भोवती असणारा सुरक्षेचा लवाजमा बघून सफिनने आयएएस अधिकारी होण्याची गाठ मनात बांधली.

सफिन शाळेत खूप हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता. उच्चशिक्षणासाठी जेव्हा त्याला पैसे कमी पडत होते तेव्हा अनोळखी लोकांकडून ८० हजार रुपयांची मदत झाली. नंतर दिल्लीत राहणाऱ्या एका जोडप्याने त्याची दोन वर्षांची ३.५ लाख रुपये फी भरली. यात त्याचे यूपीएससीसाठी लागणारे अभ्यास साहित्य, अन्न, निवास, कोचिंग फी आणि जीवन टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश होता.

सफिन सांगतो की, मी निश्तित गरीब होतो, मात्र समाजाने मला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी खूप मदत केली. माझ्याकडे जे आज आहे ते मला कधीच भेटले नसते जर माझ्यासोबत समाज उभा राहिला नसता ,असे देखील सफिन सांगतो.

सफिनला २०१८ सालच्या परीक्षेमध्ये ५७० गुण मिळाले आणि त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. सफिनने आपल्या यशाचे श्रेय हे आपल्या अभ्यासाला नाही तर त्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला दिले आहे. सफिनला समाजात योगदान देण्यासाठी तसेच गरीब मुलांच्या कल्याणासाठी एक अत्याधुनिक निवासी शाळा उघडण्याची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.