अन्वय नाईक प्रकरणात आज सकाळी अर्नब गोस्वामीला अटक झाली आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपाने या अटकेचा निषेध केला आहे. देशाचे गृहमंत्री ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. अटकेनंतर एक व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये अर्णब पत्रकारांना सांगत आहे कि मला मारले आहे.
आज कोर्टात अर्णबला हजर करण्यात येणार आहे. त्याने काही गंभीर आरोप पोलिसावर केले आहे कि त्याला मारहाण झाली आहे. अर्णब गोस्वामीचे वकील यांनी मिडीयाला बोलताना पुढील प्रमाणे माहिती दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे कि त्याच्या हाताला आणि पाठीला पोलिसांनी मारले आहे. घरातील लोकांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासोबतच अर्णबला घरात ३ तास पोलिसांनी कोंडून ठेवले होते असे सांगितले आहे.
अर्णबच्या हाताला दुखापत होती ती अजून वाढविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असे म्हणणे आहे. हि मारहाण दोन पोलिसांनी केली असे अर्णबचे म्हणणे आहे. इतकेच नाहीतर त्याच्या अटकेची माहिती पत्नीला देण्यात आली नव्हती असे सांगितले आहे. त्याच्या हाताला बांधलेली पट्टी पोलिसाकडून काढण्याचा प्रयत्न झाला आहे. असे अनेक आरोप अर्णब व त्याच्या वकिलाकडून लावण्यात आले आहे.
परंतु सत्य काय हे चौकशी नंतर पुढे येणारच आहे. अर्णब गोस्वामी याने अन्वय नाईक यांचे ८३ लाख बुडविले आणि त्यानंतर नाईक यांनी आत्महत्या केली होती. २०१८ साली पोलिसाकडे नाईक कुटुंबांनी तक्रार केली परंतु यावर चौकशी सखोल न होता हे प्रकरण दाबण्यात आले असा नाईक कुटुंबाचा आरोप आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक अथवा शेअर करायला विसरू नका.