अक्कल दाढ उशिरा येणारा दात परंतु हा दात त्रासदायक असतो. हिरड्यावर सूज कधीकधी रक्तस्त्राव इत्यादी त्रास या दातामुळे होतात. यामुळे अक्कल दाढ त्रासदायक समजल्या जाते परंतु काही उपाय वापरून हा त्रास आपण करू शकतो.
सर्वप्रथम बघूया अक्कलदाढ म्हणजे नेमके काय ? तर तोंडात सर्वात शेवटी येणारी दाढ हि अक्कल दाढ आहे. कधी कधी हि दाढ वयाच्या २५वी नंतर देखील येते. मेंदूचा पूर्ण विकास झाल्यावर हि दाढ येते म्हणून हिला अक्कल दाढ असे म्हणतात. साधारणतः हि दाढ १७ ते २५ या वयात येते. जुन्या काळात माणसाचा आहार हा कठीण होता त्यामुळे दाताची झीज होत असे आणि हि जागा भरून काढण्यासाठी अक्कल दाढ येत होती.
परंतु सध्या आपला आहार हा मउ आहे त्यामुळे दाताची झीज कमी होते आणि वाकडे दात सरळ करण्याचे प्रमाण आता सर्रास आहे त्यामुळे दात याला जागा कमी राहत आहे. त्यामुळे अक्कल दाढ त्रासदायक ठरत आहे. ८५% अक्कल दाढ शेवटी त्रासदायक ठरतात आणि त्या काढाव्या लागतात.
अक्कल दाढ दुखीवर आपण खालील प्रमाणे इलाज करू शकतात. आईस पॅकने शेकणे, निलगिरी तेल यामुळे जंतू मरतात त्यामुळे हे देखील अक्कल दाढेवर लावल्या जाते. मीठाचे पाणी याच्या गुरळ्या केल्याने देखील अक्कल दाढ दुखणे कमी होते. दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
लवंग तेल देखील अक्कल दाढेच्या त्रासाला कमी करतात तसेच कांद्याचा तुकडा अक्कल दाढेवर ठेवून चावल्यास त्याचा रस त्रास कमी करतो. पुदिन्याची पानं तुम्ही तुमच्या अक्कल दाढदुखीला कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. कारण पुदिन्याची पाने आणि पुदिना तेलामध्ये दाह कमी करण्याचे आणि थंडावा देणारे गुणधर्म असतात. तसेच काही रोज करण्यात येणारे इलाज पुढील प्रमाणे आहे. दात आणि तोंडाची स्वच्छता राखा, भरपूर पाणी प्या, साखरेचे पदार्थ कमी खा अश्या काही सवयी ठेवल्या तर अक्कल दाढ येताना कमी त्रास होतो.